ताज्या बातम्या

Ujjwala Yojana : सरकारची मोठी घोषणा! दरवर्षी मोफत मिळणार 2 एलपीजी सिलिंडर, सीएनजी-पीएनजीही झाले स्वस्त

Ujjwala Yojana : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमतीत (Fuel prices) वाढ होत आहे. लवकरच दिवाळीच्या (Diwali) सणाला सुरुवात होईल. अशातच केंद्र सरकारने (Central Govt) मोठी घोषणा केली आहे.

दरवर्षी 2 एलपीजी सिलिंडर (LPG cylinder) मोफत मिळणार आहेत, त्याचबरोबर सीएनजी-पीएनजीही (CNG-PNG) स्वस्त झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

सरकारवर 1,650 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे

केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी CNG पाईप्स आणि दोन मोफत LPG सिलिंडरद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या नैसर्गिक वायूवरील (PNG) व्हॅटमध्ये कपात केल्याने राज्य सरकारला 1,650 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. गुजरातमध्ये (Gujarat) विधानसभा निवडणुका होत असताना राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

व्हॅट 15 वरून 5 टक्के कमी केला

गुजरातचे मंत्री जितू वाघानी म्हणाले, “सरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे गृहिणी महिला, रिक्षाचालक आणि सीएनजी चालवणाऱ्या वाहनांचा वापर करणाऱ्यांना मदत होणार आहे. गुजरातमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या सीएनजी आणि पीएनजीवर 15 टक्के व्हॅट होता.

या बदलानंतर आता व्हॅट 5 टक्क्यांवर आला आहे. यामुळे सीएनजीचे दर प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीचे दर 5 रुपये प्रति घनमीटरने कमी होतील, असे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांच्या बिलात मोठा फरक दिसून येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts