Best Smart Watch Deals : मार्केटमध्ये सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच होत आहेत. सध्या स्मार्टवॉच वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीही खूप वाढल्या आहे. परंतु, तुम्ही आता दिग्ग्ज कंपन्यांचे स्मार्टवॉच खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
यात जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टवॉच विकत घ्यायचे असेल तर तुम्ही अॅमेझॉनच्या द्वारे ते खरेदी करू शकता. ही स्मार्टवॉच कोणती आहेत आणि त्यात कोणती फीचर्स दिली आहेत? त्यांची किंमत किती आहे? ते पाहुयात सविस्तर.
ही सर्व स्मार्टवॉच तुमच्या बजेटमध्ये असून त्यावर चांगली सूट मिळत आहे. या सेल दरम्यान तुम्ही 20,000 रुपये किमतीचे स्मार्टवॉच खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. आता तुम्ही अॅमेझॉनच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक, फायर बोल्ट आणि बॉट्स वॉच स्वस्तात खरेदी करू शकता.
नवीन फास्ट्रॅक रिफ्लेक्स बीट प्लस स्मार्ट वॉच
लाँच केलेल्या स्मार्टवॉचची किंमत 3,495 रुपये इतकी आहे परंतु, 57% सवलतींमुळे तुम्ही ते रु.1,495 मध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये दोन रंगांचे पर्याय येतात. स्मार्टवॉचचा डायल 1.69 इंच आहे. त्यात एकूण 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड कंपनीने दिली आहेत.
आरोग्याचा आढावा घेण्यासाठी यात 24-तास हृदय गती निरीक्षण आहे. तसेच यात तुमहाला स्लीप पॅटर्नचा डेटाही मिळेल. संगीतासाठी फोनसोबत सिंक केल्यानंतर तुम्ही त्यातील सर्व म्युझिक ऍक्सेस करू शकता. फोनचा कॅमेरा स्मार्टवॉचशी जोडता येतो.
boAt Wave Edge ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच
या स्मार्टवॉचची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, परंतु, 67 टक्के सवलतीमुळे तुम्ही ते 2,999 रुपयांना विकत घेऊ शकता. हे स्मार्टवॉच ब्लॅक, बॅश, ब्लू आणि ग्रीन अशा 4 कलरमध्ये लॉन्च केले आहे. यात 1.85 इंच HD डिस्प्ले असून 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत.
तसेच सर्व फिटनेस फीचर्स आणि व्हॉइस असिस्टंट आहेत.एकदा चार्ज केल्यांनतर याची बॅटरी 7 दिवसांपर्यंत चालते. यात तुम्ही 20 कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकता. यासोबतच कॉलिंगसाठी स्पीकर आणि माईकही आहे.
फायरबोल्ट इन्फिनिटी स्मार्ट वॉच
या स्मार्ट वॉचची किंमत 19,999 रुपये असून जी लॉन्चिंग ऑपरेशनमध्ये 70% डिस्काउंटनंतर 5,999 रुपयांमध्ये मिळत आहे. यात ब्लॅक, गोल्ड ब्लॅक आणि सिल्व्हर असे 3 कलर पर्याय उपलब्ध आहेत. 1.6 इंच एचडी राउंड डायल असून यात ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हॉईस असिस्टंट फीचर आहे. तसेच यात 300 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 4GB स्टोरेज कंपनीने दिलेले आहे.