Upcoming 7 Seater Cars In India: देशात आता 7 सीटर कार्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. ग्राहक बाजारात मोठ्या प्रमाणत ह्या कार्सची खरेदी करत आहे. तुम्ही देखील येणाऱ्या नवीन वर्षात नवीन 7 सीटर कार्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये नवीन वर्षात येणाऱ्या काही दमदार 7 सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला कार खरेदी करताना मोठा फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतात नवीन वर्षात Toyota सह MG आणि Kia सारख्या कंपन्या देखील आपल्या नवीन 7 सीटर कार सादर करणार आहे. चला तर जाणून घ्या येणाऱ्या नवीन वर्षात कोणत्या 7 सीटर कार्स भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालणार आहे.
Kia आणि MG लक्झरी कार
Kia Motors पुढील वर्षी आपल्या लक्झरी MPV कार्निव्हलचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ऑटो एक्सपो 2023 मध्ये नवीन कार्निव्हलची झलक पाहायला मिळेल. आता अधिक चांगल्या लूक आणि फीचर्ससह नवीन कार्निव्हल लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहे.
त्याचप्रमाणे, MG Motor India देखील पुढील वर्षी आपल्या 7 सीटर SUV MG Hector Plus चे फेसलिफ्टेड मॉडेल आणत आहे, ज्यामध्ये बरेच कॉस्मेटिक बदल तसेच काही यांत्रिक बदल दिसून येतील. या दोन दमदार आणि लक्झरी कार्सबाबत अधिक तपशील येत्या काळात समोर येतील.
कोणत्या नवीन कार्स येत आहेत?
टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडिया पुढील महिन्यात त्यांच्या नेक्स्ट जनरेशन इनोव्हा, म्हणजेच टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची किंमत जाहीर करणार आहे. 7 आणि 8 सीटर पर्यायांमध्ये येत असलेल्या, इनोव्हा हायक्रॉसचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
या मोठ्या कारने आधीच लोकांची मने जिंकली आहेत. असे मानले जाते की इनोव्हा हायक्रॉस 22 लाख ते 30 लाख रुपयांच्या किमतीच्या रेंजमध्ये ऑफर केली जाऊ शकते. या सगळ्यांसोबत अशीही बातमी येत आहे की येत्या काळात टोयोटा इनोव्हा क्रिस्टा चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च केले जाऊ शकते, ज्यामध्ये काही कॉस्मेटिक बदल आणि चांगले फीचर्स पाहायला मिळतील.
हे पण वाचा :- Pan Card : पॅन कार्डमध्ये चूक झाली तर ‘या’ पद्धतीने करा दुरुस्त ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया