Upcoming 7 Seaters Cars : सध्या भारतीय बाजारात 7 सीटर कारला मोठ्या प्रमाणात आहे. अशातच अनेक कंपन्या 7 सीटर कार बाजारात आणत आहे. जर तुम्हीही 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण भारतीय बाजारात लवकरच Ertiga नाही तर एक नवीन 7 सीटर कार लाँच होणार आहे. जी तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. लवकरच मारुती सुझुकीची एंगेज भारतीय बाजारात धुमाकूळ घालताना दिसेल.
आता सर्व कंपन्या सात सीटर सेगमेंटमध्ये उतरत असून भारतात टोयोटाकडून आपल्या इनोव्हाचे दोन नवीन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. तर मारुतीचे दोन मॉडेल्सचीही या सेगमेंटमध्ये विक्री करण्यात येत आहे. Kia कडूनदेखील Kia Carens आणली आहे. परंतु आता तुम्हाला या सर्वांच्या वर काही उत्तम पर्याय दिले जात आहेत. या यादीत काही नवीन सात सीटर कारचा समावेश आहे.
निसान ट्रायबर मॉडेल
निसान आता लवकरच रेनॉल्टच्या सहकार्याने नवीन 7 सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे रेनॉल्ट ट्रायबरवर आधारित असून सध्या कार ही देशातील सर्वात स्वस्त 3 रो 7 सीटर कार आहे. कंपनी तिची किंमत खूप कमी ठेवू शकतो. तर आगामी कारमध्ये वैशिष्ट्ये खूप प्रीमियम असतील.तसेच यात मोठी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि स्टार्ट स्टॉप बटण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टोयोटाची आगामी 7 सीटर कार
टोयोटा सुझुकीने भागीदारी केली असून याअंतर्गत टोयोटा आपली आगामी सात सीटर कार आणेल. आगामी कार मारुती एर्टिगा वर आधारित असेल . नुकतेच दक्षिण आफ्रिकेत रीबॅज लॉन्च केली आहे. याला रुमियान असे नाव दिले आहे. हेच मॉडेल देशात लाँच होऊ शकते.
मारुती सुझुकीची एंगेज
देशातील सर्वात लोकप्रिय कार कंपनी मारुती सुझुकी आता आपली आगामी सात सीटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी, मारुतीकडून मारुती एंगेज नावासाठी ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्यात आला होता.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असणारी ही कार Engage नावाने लॉन्च करण्यात येईल. इनोव्हा हायक्रॉस सात ते आठ सीट व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. त्यात फीचर्समध्ये ADAS चा समावेश केला जाणार आहे. कंपनीकडून येत्या काही महिन्यांत ही नवीन सात सीटर लॉन्च केली जाणार आहे.