Upcoming CNG Car : देशात पेट्रोल व डिझेलचे (petrol and diesel) दर गगनाला भिडले असताना जर तुम्ही स्वत:साठी नवीन सीएनजी कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
कारण मारुती आणि टोयोटा (Maruti and Toyota) हे मोठे वाहन उत्पादक भारतीय बाजारपेठेत (Indian market) त्यांचे नवीन वाहन लॉन्च (Launch) करणार आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी सीएनजी वाहनांची यादी घेऊन आलो आहोत.
Toyota Glanza CNG
टोयोटा लवकरच भारतीय बाजारपेठेत फेसलिफ्टेड ग्लॅन्झाची CNG आवृत्ती लॉन्च करणार आहे. कंपनी याला 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह ऑफर करेल. हे पेट्रोल मॉडेलमध्ये 88.5 bhp आणि द्वि-इंधन CNG आवृत्तीमध्ये 76.4 bhp जनरेट करते आणि ते 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.
Maruti Suzuki Baleno CNG
मारुती आजपासूनच नव्हे तर अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयात वावरत आहे. जर तुम्ही नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही काळ थांबू शकता.
मारुती सुझुकी बलेनो हे कंपनीचे पहिले Nexa मॉडेल असेल जे CNG आवृत्तीमध्ये सादर केले जाईल. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले 1.2-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. ही कार 25 किमी/किलोपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.
Kia Sonet CNG
कंपनीने या कारची चाचणी सुरू केली असून वर्षाच्या अखेरीस ही कार लॉन्च केली जाऊ शकते. Kia द्वारे Sonet CNG 1.0-लीटर टर्बो पेट्रोल मोटरसह ऑफर केली जाऊ शकते. जे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडले जाईल. सोनी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येणारी ही भारतातील पहिली Kia कार देखील असू शकते.