ताज्या बातम्या

UPSC Civil Services Final Result : अंतिम निकाल जाहीर, मुलींचे वर्चस्व ! वाचा सविस्तर निकाल

UPSC Civil Services Final Result 2021 : UPSC ने नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. मुलींनी पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. श्रुती शर्मा अव्वल, अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गामिनी सिंगला तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात श्रुती शर्मा अव्वल ठरली आहे.

यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यानंतर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा होती. उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर राहिला. आठवा रँक इशिता राठी, नववा रँक प्रीतम कुमार आणि दहावा रँक हरकिरत सिंग रंधावाला मिळाला आहे.

दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत भाग घेतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. आयोगाने ५ एप्रिल ते २६ मे दरम्यान मुलाखती घेतल्या होत्या.

UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2021 कसा तपासायचा

सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर UPSC नागरी सेवा निकाल 2021 – अंतिम निकालाची लिंक दिसेल.
येथे तुम्हाला निवडलेल्या उमेदवारांच्या नावांसह PDF फाइल दिसेल.
आता तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट ठेवू शकता.

UPSC द्वारे नियुक्तीसाठी एकूण 685 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 244 सामान्य, 73 EWS, 203 OBC, 105 SC आणि 60 ST प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.

UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांनंतर निकाल जाहीर केला जातो. जे निकालात यशस्वी होतात ते IAS, IFS इत्यादी अधिकारी होतात.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts