ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : 100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिल्या जातात? UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या अशाच अनेक प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या

UPSC Interview Questions : UPSC परीक्षा (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत उमेदवाराला (Candidate) असे काही सोप्पे आणि विचारात पाडणारे प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळून जातो.

अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची (IAS Interview) व्हायला हवी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो परंतु उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न: ढगाचे सरासरी वजन किती असते?
उत्तर: 1.1 दशलक्ष पौंड (100) हत्ती

प्रश्न: कोणत्या देशात रेल्वे व्यवस्था नाही?
उत्तर: आइसलँड

प्रश्न: पुस्तके छापणारा पहिला देश कोणता?
उत्तर : चीन

प्रश्नः शंभर रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिल्या जातात?
उत्तर: १७

प्रश्न: जगातील सर्वात जास्त पिण्यायोग्य पाणी कोणत्या देशात आहे?
उत्तर: ब्राझील

प्रश्न: कोणत्या प्राण्याला पाच डोळे आहेत?
उत्तर: मधमाशी

प्रश्न: कोणत्या देशात दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो?
उत्तर: स्वित्झर्लंड

Renuka Pawar

Recent Posts