ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : कारचा शोध कोणी लावला? UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या अशाच प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या सावितर

UPSC Interview Questions : UPSC परीक्षा (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत उमेदवाराला (Candidate) असे काही सोप्पे आणि विचारात पाडणारे प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळून जातो.

अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची (IAS Interview) व्हायला हवी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो परंतु उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न: कोणता प्राणी कधीही आजारी नसतो?
उत्तर: शार्क

प्रश्नः कोणत्या देशात भिकाऱ्यांना भीक मागण्यासाठी परवाना घ्यावा लागतो?
उत्तर: स्वीडनमध्ये स्थित ‘एस्किलस्टुना’ शहरात

प्रश्न: एक पक्षी जो उलटा उडू शकतो?
उत्तरः हमिंग बर्ड

प्रश्न: कारचा शोध कोणी लावला?
उत्तर: निकोलस जोसेफ कुगानोट

प्रश्न: रस्त्यावरील पिवळ्या पट्ट्याचा अर्थ काय आहे?
उत्तर: राष्ट्रीय महामार्ग

प्रश्न: भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याचे नाव सांगा?
उत्तर: मोर

प्रश्न: भारतीय रेल्वेची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: 16 एप्रिल 1853

Renuka Pawar

Recent Posts