अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत झालेल्या तब्बल २२ कोटींच्या फसवूणक प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जयदीप वानखेडे व आशुतोष लांडगे अशी त्यांची नावे आहेत.
त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्याची संख्या चार झाली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत बँकेची तब्बल २२ कोटींची फसवूणक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना पुण्यातून सोमवारी दुपारनंतर अटक केली. यापूर्वी याप्रकरणात नवनीत सुरपुरिया व यज्ञेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
त्या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (९मार्च) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी याप्रकरणी वानखेडे व लांडगे यांना अटक करण्यात आली.
बनावट मूल्यांकन सादर करून करण्यात आलेल्या या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. वानखेडे यांना मंगळवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
त्यानंतर पोलिस त्यांची कसून चौकशी करणार आहेत. कर्जप्रकरणात बनावट मुल्यांकन सादर करून चिंचवड शाखेची २२ कोटीची फसवणूक झाली होती.
२६ मार्च २०१८ ते २५जानेवारी २०२१ दरम्यान, चिंचवड येथील बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला होता. पोलिसांनी धडक कारवाई केल्याने अनेकजण धास्तावले आहेत.