ताज्या बातम्या

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ! योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून आघाडीवर, तर भाजप ‘इतक्या’ जागेवर पुढे

Uttar-Pradesh Assembly Election Live : ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. भाजप, काँग्रेससह अनेक मोठं मोठ्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबाबत मोठी माहिती मिळत आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणूक काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. त्यांचा आज निकाल लागत आहे. मतमोजणी सुरु झाली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपचे (BJP) च उत्तर प्रदेश मध्ये सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून (Gorakhpur) आघाडीवर असल्याचे दिसत आहेत. उत्तरप्रदेश मध्ये ४०३ जागांसाठी निआवडणूक झाली आहे. मिळवण्यासाठी २०२ जागांची गरज आहे.

भाजपला उत्तर प्रदेश मध्ये जवळपास २४० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सपाला १५० जागा मिळतील आणि दुसऱ्या नं चा पक्ष म्हणून राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आणि निवडणूक निकाल ही त्याच दिशेने झुकत असल्याचे दिसत आहे.

Renuka Pawar

Recent Posts