पारनेरच्या क्रीडा संकुलात लसीकरणाची व्यवस्था

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाने वेगाने पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नगरमध्ये भयावह परिस्तिथी निर्माण झाली आहे.

यातच आता शासनाने कोरोनाला अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यातच नागरिकांकडून देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. नुकतेच जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

यातच पारनेर शहरातील ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांच्या कोविड लसीकरणाची व्यवस्था पारनेरच्या क्रीडा संकुलात करण्यात आली, तर १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

हा बदल शनिवारपासून होणार आहे. पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड उपचार केंद्र (डीसीएचसी) उभारण्यात आले.

कोविड चाचण्यांसाठी घशातील व नाकातील स्त्रावाचे नमुने घेण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातच करण्यात आली. तेथेच कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक, चाचणीसाठी आलेले

संशयित रुग्ण तसेच लसीकरणासाठी आलेले नागरिक यामुळे ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी होत असे. त्यामुळे आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था पुणेवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात करण्यात आलेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts