महाराष्ट्रात तब्बल इतक्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  देशात कोरोनाची दुसरी लाट रोकण्यासाठी लसीकरण मोहीम जोर धरत आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांचा उत्साह देखील वाढला आहे. नागरिकांने लसीकरण केंद्रावर दिवसभर उभा राहून लसींची प्रतीक्षा केली.

लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जाहिराती केल्या. दरम्यान आता तब्बल ४ कोटी ७१ लाख ५८ हजार २१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

हि माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. ‘महाराष्ट्रात कालपर्यंत ४ कोटी ७१ लाख ५८ हजार २१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.दि.9 ऑगस्ट 2021 रोजी 3,85,057 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.’ असे ते म्हणाले.

कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला २१ जून २०२१ रोजी सुरुवात झाली आहे. भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण ३,१०,५५,८६१ तर गेल्या २४ तासात ४०,०१७ रुग्ण कोविड-१९ संसर्गातून बरे झाले आहेत.

रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर ९७.३७ % झाला आहे. भारतात गेल्या २४ तासात ३८,६२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग ४१ दिवस ५०,००० पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts