Vastu Tips : जेव्हा तुमची चांगली वेळ (Good Time) येणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यात (Life) खूप संकटे येतात. तेव्हा या संकटाला पाठ न फिरवता या संकटांचा सामना करा.
जर तुम्हाला वाटेत शंख (Conch),नाणी (Coin) यांसारख्या वस्तू सापडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण या वस्तूंमुळे तुमची प्रगती (Progress) होईल.
वाटेत नाणे, शंख सापडणे
अनेक वेळा तुम्हाला वाटेत अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्या ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) खूप शुभ मानल्या जातात. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की जर तुम्हाला वाटेत घोड्याची नाल, स्वस्तिक, नाणी किंवा शंख दिसला तर ते तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येण्याचे संकेत देते.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू वाटेत पडून दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात नशीब येणार आहे. स्वस्तिकचे चिन्ह (Symbol of swastika) ज्या मार्गाने बनवले आहे त्या मार्गात तुम्हालाही अशी काही वस्तू पडलेली दिसली तर ती उचलून त्याची पूजा करावी आणि नंतर घराच्या अंगणात किंवा बागेत पुरून टाकावी.
जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही ते पूजेच्या ठिकाणी देखील ठेवू शकता. जर तुम्हाला घोड्याचा नाल सापडला तर तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा. दुसरीकडे धन किंवा शंख मिळाल्यास पूजास्थानी ठेवा. असे केल्याने तुमचे नशीब काही दिवसात उजळेल.