Vastu Tips For Kitchen: माणसाच्या आयुष्यात अशी देखील एक वेळ येथे जेव्हा त्याच्या घरात आर्थिक टंचाई निर्माण होते त्याच बरोबर कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात या पाठीमागे अनके कारण असू शकतात मात्र एक कारण म्हणजे वास्तुदोष हे देखील असू शकते.
आम्ही तुम्हाला सांगतो वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराला एक विशेष स्थान देण्यात आले आहे. माँ अन्नपूर्णेचे हे निवासस्थान मानले जाते. अशा वेळी स्वयंपाकघरातील वास्तू दोषांचाही कुटुंबावर मोठा प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या इथे चुकूनही ठेवू नयेत.
काच
स्वयंपाकघरात काच लावून नकारात्मक शक्तींना मेजवानी मिळते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात काच लावल्याने अग्नीचे प्रतिबिंब निर्माण होते, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण होते आणि हे हानिकारक ठरू शकते.
झाडू
झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जात असले तरी झाडूला चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नये. असे करणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो. स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि आई अन्नपूर्णाही रागावते.
औषध
औषधे देखील स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाहू लागते आणि व्यक्तीला त्रास, आजार आणि आर्थिक संकट यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही घरी कोणतेही औषध वापरत असाल तर ते स्वयंपाकघरापासून दूर ठेवा.
तुटलेली भांडी
अनेकवेळा भांडी तुटल्यानंतरही लोक स्वयंपाकघरातून बाहेर काढत नाहीत. मात्र असे करणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले गेले आहे. स्वयंपाकघरात तुटलेली भांडी किंवा कोणत्याही प्रकारची रद्दी असू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णा कोपतात आणि घरात धन-धान्याची समस्या निर्माण होऊ शकते.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही.)
हे पण वाचा :- IND vs SL: श्रीलंकेच्या अडचणीत वाढ ! भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार गोलंदाज ; निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय