श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे वसुंधरा फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . तसेच मोफत आरोग्य व नेत्र तपासणी स्त्रीरोग , व्यंधत्व निवारण शिबिराचे देखील आयोजन केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या वसुंधरा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते . यावर्षी रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत महर्षी दधीची ऋषी समाधी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास सरपंच जयश्रीताई विश्वासराव गुंजाळ व उद्योजक विश्वासराव गुंजाळ यांच्याकडून जेवणाचा डबा व पाणी बॉटल भेट म्हणून दिली जाणार आहे.
सर्व रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे.यामध्ये प्रथम क्रमांक धरमचंद भवरीलाल सराफ अँड ज्वेलर्स घोडनदी यांच्याकडून स्पोर्ट सायकल,द्वितीय क्रमांकसाठी योगेश बाळासाहेब कोरके यांच्याकडून विद्युत पंप तर तृतीय क्रमांकासाठी शांताराम गुंजाळ यांच्याकडून फवारणी पंप भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.
तसेच जोडीने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पैठणी साडीची भेट पोलीस सागर बनकर व सुधीर ढवळे वेदांत कॉम्प्युटर यांच्याकडून दिली जाणार आहे.
महिला रक्तदात्यांसाठी भव्य लकी ड्रॉ चे देखील आयोजन केले आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक उपसरपंच सचिन बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून मिक्सर ,द्वितीय क्रमांकासाठी अनिल नामदेव बनकर यांच्याकडून मल्टी कढई सेट तर तृतीय क्रमांकासाठी ग्रा.सदस्य तुषार बाळासाहेब वाघमारे यांच्याकडून नॉन स्टिक पॅन सेट भेट म्हणून दिला आहे.
यावेळी सर्वांसाठी भोजनाचे आयोजन केले आहे.तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करण्याचे आवाहन वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून केले आहे.