अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- भाजीपाला विक्रेतेला आणि त्याच्या कुटुंबाला घरात घुसून शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील तपोवन रोड परिसरात घडली आहे.
या प्रकरणात पांडुरंग मारुती काळे( रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोक गिते याला फिर्यादी हे तू माझ्या घराकडे का पाहतो असे विचारण्यासाठी गेले असता अशोक याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर काही वेळाने अशोक गिते, सोमनाथ गिते व इतर चौघांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याचदरम्यान भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या दोन्ही मुलींना आरोपींनी शिवीगाळ केली.
आरोपी म्हणाले, तू जर आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या मुलींना जीवंत सोडणार नाही, असे म्हणाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर क्षीरसागर करीत आहे.