ताज्या बातम्या

Vi Recharge Offer : 28 दिवसांच्या रिचार्जमध्ये 1 वर्षासाठी मोफत वापरा ‘हे’ ओटीटी प्लॅटफॉर्म, किंमत जाणून व्हाल चकित

Vi Recharge Offer : रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या भारतातील आघाडीच्या खाजगी टेलिकॉम कंपन्या तर बीएसएनएल ही आघाडीची सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असतात.

अशीच एक ऑफर वोडाफोन-आयडिया कंपनी घेऊन आली आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला आता संपूर्ण वर्षभरासाठी मोफत Disney + Hotstar वापरता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या प्लॅनची किंमतही अगदी कमी आहे.

Vodafone-Idea ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे, जी 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे सदस्यत्व संपूर्ण 1 वर्षासाठी देते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये दररोज मिळणारा डेटा आणि अमर्यादित मोफत कॉलिंगचे सारखे फायदे दिले जातात. या रिचार्जसह, वापरकर्त्यांना 16GB अतिरिक्त डेटाचा लाभ दिला जातो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि कंपनीच्या स्ट्रीमिंग अॅपचे प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध होते.

किती आहे मोफत OTT प्लॅनची ​​किंमत

​​डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी विनामूल्य असून कंपनीच्या प्लॅनची किंमत 601 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध आहे, तसेच यात दररोज १०० एसएमएसही उपलब्ध असून या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला दररोज 3GB डेटा मिळतो. सध्या वापरकर्त्यांना 16GB अतिरिक्त डेटाचा लाभही मिळत आहे. जरी त्याची वैधता 28 दिवस असली तरी, Disney + Hotstar चे सदस्यत्व हे संपूर्ण वर्षासाठी उपलब्ध असणार आहे.

हे लक्षात घ्या की हा प्लॅन ‘Vi Hero Unlimited’ चा एक भाग असून वापरकर्त्यांना कोणतेही अतिरिक्त पैसे न देता रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटेड इंटरनेट वापरता येते. इतकेच नाही तर, प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा उपलब्ध केली जात आहे.

हे समजून घ्या की दैनंदिन डेटा जो संपूर्ण आठवडाभर वापरण्यात येत नाही, तो शनिवार आणि रविवारी एकत्रित करण्यात येतो. डेटा डिलाइट्ससह, वापरकर्त्यांना ViApp वर जाऊन 2GB पर्यंत अतिरिक्त डेटाचा दावा करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV वर VIP प्रवेश देण्यात येत आहे.

या प्लॅनसह करू शकता रिचार्ज

जर कंपनीच्या ग्राहकांना Disney + Hotstar मोफत हवे असल्यास काही इतर प्लॅनमध्ये रिचार्जचा पर्याय उपलब्ध आहे. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 151 रुपयांचा असून ज्यात 8GB हाय-स्पीड डेटा 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे. इतकेच नाही तर यात डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी उपलब्ध होत आहे. या व्यतिरिक्त, 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 601 रुपयांच्या प्लॅनच्या इतर फायद्यांशिवाय केवळ तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts