Vi Recharge Plan : सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्जचे दर वाढवले आहेत. तेव्हापासून आता ज्यांचे कमी बजेट आहे त्यांचे टेन्शन वाढले आहे. या कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहकांसाठी एक सर्वात मोठी समस्या बनली आहे.
अशातच जर ग्राहकांना एकाच वेळी दोन सिम वापरायचे असेल तर पूर्वीप्रमाणे ते सोपे राहिले नाही. कंपन्यांनी जरी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या असल्या तरी वोडाफोन आयडियाचे काही रिचार्ज प्लॅन हे ग्राहकांना दिलासा देत असतात. कंपनीने असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे.
हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना जास्त दिवसांची वैधता पाहिजे असून त्यांना जास्त डेटाची गरज नाही. कंपनीचा 549 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
किती आहे रिचार्ज प्लॅनची किंमत?
या प्लॅनची किंमत 549 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा उपलब्ध मिळत असून यात जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळवायचा असेल तर तुम्हाला डेटा व्हाउचरसाठी सदस्यता घ्यावी लागेल. राष्ट्रीय तसेच स्थानिक कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारण्यात येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 549 रुपयांचा टॉकटाइम मिळू शकतो.
कंपनीकडून हा प्लॅन गुपचूप त्यांच्या प्रीपेड ऑफरच्या वैधता विभागात जोडण्यात आला आहे. जेव्हा ग्राहक त्यांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज पाहतील तेव्हा ते रिचार्जची रक्कम तुम्हाला पाहता येईल. ज्या वापरकर्त्यांना त्यांचे दुय्यम सिम सक्रिय ठेवायचे असल्यास तर त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.