अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सामाजिक कार्य करणारे विनोद गायकवाड यांच्या कामाची दखल घेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने युवक प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच भारिप-बहुजन मध्ये विनोद गायकवाड यांनी नागरिकांच्या सामाजिक प्रश्न संदर्भात आंदोलन व मोर्चे काढून न्याय मिळवून दिलेला आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर व युवकांमध्ये जनसंपर्क दांडगा असल्याने गायकवाड यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये युवकांची मोठी फळी निर्माण करून युवकांचा नोकरी विषय व मार्गदर्शन विषय संदर्भात मोठा मेळावा घेण्यात येणार व युवकांचे विविध प्रश्नांना वाचा फोडून युवकांना न्याय देण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच या निवडीबद्दल विनोद गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.