Viral News : देशातच नाहीतर जगात कुठेही जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतला तर तो परतफेड करण्यासाठी त्याच्यावर मोठा दवाब असतो त्यामुळे तो धडपडत करत असतो मात्र कधी कधी असा काही काम करतो ज्यामुळे त्याला तुरुंगात देखील जावे लागते अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. जी आता सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो ही घटना आपल्या देशाची नाहीतर ब्रिटनमधील मँचेस्टरमधील आहे जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने कर्ज घेतला होता आणि त्याची परतफेड करण्यासाठी धडपडत करत होता मात्र याच दरम्यान त्याने आश्चर्यकारक काम केला ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले. आम्ही तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीने कर्ज परतफेड करण्यासाठी चक्क त्याच्या प्रेयसीच्या घरी गांजा लावला जे पाहून पोलिसांचाही गोंधळ उडाला.न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान धक्कादायक हा सत्य समोर आले आहे.
सुनावणीदरम्यान असे सांगण्यात आले की, केविन रोलँड्स, 30, यांनी कर्ज फेडण्यासाठी गुप्तपणे त्याची गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन पार्टनर सिमोन केनयनच्या रिकाम्या घराचे गांजाच्या फार्ममध्ये रूपांतर केले होते. बेडरुमपासून घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत त्यांनी सुमारे 15 लाख रुपयांची भांगेची रोपे लावली होती. पण जेव्हा वीज कंपनीचे लोक गॅस मीटर बसवण्यासाठी केनियनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना डझनभर भांगाची रोपे उगवलेली दिसली.
सुरुवातीला, चौकशीदरम्यान केविनने हे नाकारले पण नंतर त्याचे कृत्य उघड झाले. न्यायालयात, केविन स्थानिक ड्रग टोळ्यांच्या आदेशानुसार गांजाचे उत्पादन केल्याबद्दल दोषी आढळले आणि त्याला 19 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण नंतर त्याचे रूपांतर दोन वर्षांच्या निलंबित शिक्षेत करण्यात आले.
असा युक्तिवाद केला की केविनला त्याच्या मुलीची काळजी घ्यावी लागते कारण त्याचा जोडीदार आजारी आहे मेट्रो यूकेच्या म्हणण्यानुसार, फिर्यादीचे वकील अँड्र्यू यांनी कोर्टात सांगितले तपासात केविनच्या बोटांचे ठसे रोपांवर सापडले आहेत. त्याला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे होते. त्यामुळे त्याला गांजाचे उत्पादन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणात केविनची मैत्रीण केनयनची निर्दोष मुक्तता करण्यात आली.