Viral News : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक किस्से तुम्ही पाहत असाल जे पाहून तुम्हाला हसायला तरी येत असेल नाहीतर आश्चर्य तरी वाटत असेल. चक्क एका ठिकाणी पोलिसांनी मृत डासाच्या मदतीने चोराला पकडले आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे. हो हे घडले आहे.
हे प्रकरण शेजारील देश चीनचे (China) आहे. एका पाकिस्तानी वेबसाइटनुसार, चीनच्या फोजियान राज्यातील (Fojian State) फुझोउ या शहरातील एका अपार्टमेंट दरोड्यात भिंतीवर रक्ताने भिजलेल्या मृत डासाने (Dead mosquitoes) गुन्हेगाराला (criminal) पकडण्यात मदत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुजो येथे गेल्या महिन्यात दरोड्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलीस (Police) तपासासाठी त्या ठिकाणी पोहोचले. तपास सुरू केला असता चोरट्याने बाल्कनीतून इमारतीत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.
बातमीनुसार, तपास पथकाला किचनमध्ये नूडल्स आणि शिजवलेले अंडी सापडले, तर कपाटातून ब्लँकेट आणि उशा उचलून बेडवर पडलेले दिसले. असे वाटले की अपार्टमेंटमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीने संपूर्ण रात्र त्या घरात घालवली.
तपासादरम्यान त्याला भिंतीवर मृत डास आणि रक्ताचे डाग दिसल्याने एक मनोरंजक ट्विस्ट समोर आला. त्यानंतर रक्ताची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.जेव्हा डीएनए चाचणी केली गेली तेव्हा असे दिसून आले की तो माणूस चाय नावाच्या व्यक्तीचा होता,
ज्याचा रेकॉर्ड आधीच गुन्हेगार होता. दरोड्याच्या 19 दिवसांनंतर या व्यक्तीचे नाव उघड झाल्यानंतर पोलिसांनी चाईला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याने या चोरीसह आणखी तीन दरोडे केल्याची कबुली दिली. आता त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईही सुरू आहे.