Viral News : देशात आणि जगात विचित्र घटना घडत असतात. तसेच काही विचित्र घटनांचे व्हिडीओ (Video) आणि फोटो (photo) समोर येत असतात. मात्र बिहारमध्ये एक अजबच घटना घडली आहे. एका बहाद्दराने चक्क रेल्वेच्या ईंजिनखाली (Under train engine) बसून १९० किमीचा प्रवास (Travel) केला आहे.
मात्र याची माहिती कोणालाच लागली नाही. गया स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर इंजिन ड्रायव्हरला हा प्रकार कळला आणि इंजिनखाली बसलेल्या व्यक्तीने पाणी मागायला सुरुवात केली.
तो माणूस इंजिनच्या ट्रॅक्शन मोटरजवळ बसला होता
वास्तविक ही घटना गया स्टेशनची आहे. वास्तविक वाराणसी सारनाथ बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेसने (Varanasi Sarnath Buddha Pournima Express) राजगीर स्टेशन (Rajgir station) सोडले आणि गया स्टेशनवर पहाटे ४ वाजता पोहोचली.
इंजिन ड्रायव्हर प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्याला कोणीतरी पाणी मागत असल्याचा आवाज ऐकला. टॉर्च पेटलेली पाहिली तेव्हा इंजिनमधून माणसाचा आवाज येत होता. तो इंजिनच्या ट्रॅक्शन मोटारीजवळ बसला होता.
बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या व्यक्तीची सुटका करण्यात आली
यानंतर चालकाने तात्काळ स्थानक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मग काय, तिथे संपूर्ण कर्मचारी जमा झाले आणि त्या व्यक्तीला इंजिन मशीनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. खूप प्रयत्नानंतर त्या माणसाला बाहेर काढण्यात आले. रेल्वेच्या इंजिनमधून ओढलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तो वेडा असल्याचं म्हटलं जातं.
ही व्यक्ती राजगीरमध्येच इंजिनमध्ये घुसली होती.
हे इंजिन WAP-7 मॉडेल एबीबी इंजिन असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या इंजिनच्या खाली जाणे अवघड आहे आणि तिथे बसणे त्याहून कठीण आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने इंजिनच्या मध्यभागी इतका प्रवास करणे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
कारण ही ट्रेन राजगीर ते गया दरम्यान 6 स्टेशनवर थांबते. या स्थानकांवर या ट्रेनचा थांबा 2 ते 10 सेकंदांचा आहे. इतक्या कमी वेळेत इंजिनच्या ट्रॅक्शन मोटरजवळ बसणे कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही. त्यामुळे ही व्यक्ती राजगीरमध्येच ट्रॅक्शन मोटारीजवळ बसली असावी, असा अंदाज आहे.