Vivo New Smartphone : विवोचा जबरदस्त फ्लिप स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत..

Vivo New Smartphone : जर तुम्ही उत्तम फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता विवोने आपले दोन शानदार स्मार्टफोन लाँच केले आहेत.

नुकतेच कंपनीने Vivo X Fold 2 आणि X Flip हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण हे फोन चीनमध्ये लाँच केले आहेत. भारतात अजूनही हा फोन लाँच केला नाही. कंपनीने यात शानदार फीचर्स दिली आहेत.

किती आहे फोनची किंमत?

Vivo X Fold 2 चे तीन रंग पर्यायात म्हणजे Shadow Black, China Red आणि Azure Blue उपलब्ध आहेत. या फोनच्या 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 8,999 (सुमारे 1,07,500 रुपये) तसेच 512GB ची किंमत CNY 9,999 (सुमारे 1,19,400 रुपये) इतकी आहे.

तसेच Vivo X Flip ची किंमत 256GB व्हेरिएंटसाठी CNY 5,999 (अंदाजे रु. 71,600) तसेच 512GB व्हेरियंटसाठी CNY 6,699 (अंदाजे रु. 80,000) रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. यात डायमंड ब्लॅक, लिंग पर्पल आणि सिल्क गोल्ड असे तीन रंग पर्याय कंपनीकडून देण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन 28 एप्रिलपासून चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या फीचर्स..

Vivo X Fold 2 च्या आतील डिस्प्लेमध्ये 8.03-इंच E6 AMOLED LTPO HDR10+ पॅनेल देण्यात आला आहे. तर त्याचे रिझोल्यूशन – 2,160 x 1,916 पिक्सेल इतके असणार आहे. कंपनीच्या या फोनमध्ये Origin OS 3 सह Android 13 आउट दिला आहे. तसेच Snapdragon 8 Gen 2 चिपसेट प्रोसेसर दिला आहे.

तसेच कंपनीच्या दुसऱ्या फोनमध्ये म्हणजेच Vivo X Flip च्या अंतर्गत डिस्प्लेमध्ये 6.74-इंचाचा फुल HD+ (2,520 × 1,080) AMOLED डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. कंपनीचा हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित असून 2GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS3.1 अंतर्गत स्टोरेजसह तो Android 13-आधारित OriginOS 3 वर चालतो.

कॅमेरा

Vivo X Fold 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असून या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMCX866 प्राइमरी आणि Zeiss T* लेन्स कोटिंग, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 12MP टेलिफोटो लेन्सचा समावेश असणार आहे.

यात बाह्य डिस्प्ले पॅनलच्या शीर्षस्थानी 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर कंपनीच्या दुसऱ्या फोनमध्ये म्हणजे Vivo X Flip मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे ज्यात 50MP प्राथमिक लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश असून यात 32MP सेल्फी कॅमेरा असणार आहे.

बॅटरी बॅकअप

बॅटरी बॅकअपचा विचार केला तर Vivo X Fold 2 फोन 120W जलद चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगसाठी समर्थनासह 4,800mAh बॅटरी पॅक करतो. तर Vivo X Flip 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,400mAh बॅटरीसह येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts