ताज्या बातम्या

Vivo Y02 : 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय विवोचा स्मार्टफोन, ‘येथून’ खरेदी करा

Vivo Y02 : देशातील विवो ही दिग्ग्ज टेक कंपनी आहे. तुम्ही आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Vivo Y02 हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. परंतु, यावर त्या स्मार्टफोनवर 30% सवलत मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही तो 8,999 रुपयांना विकत घेऊ शकता. यात कंपनी वापरकर्त्यांसाठी 5000mAhबॅटरी दिली आहे. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. लवकरात लवकर या फोन विकत घ्या नाहीतर तुम्ही चांगली संधी गमावू शकता.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने वापरकर्त्यांसाठी या फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51-इंच HD + Halo फुलव्यू डिस्प्ले दिला आहे. जर स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 3 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यात तुम्हाला मीडियाटेकचा ऑक्टा-कोर चिपसेट पाहायला मिळेल. कंपनी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी बेसिक कॅमेरा सेटअप देत असून याच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला आहे.

त्याच वेळी, तुम्हाला त्याच्या समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा दिसेल. फोनमध्ये बॅटरी 5000mAh ची दिली आहे. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 Go Edition वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 2.4 GHz/5 GHz, Bluetooth 5.0, USB 2.0, 4G आणि GPS सारखे पर्याय दिले आहेत. Vivo Y सीरिज फोन ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Vivo Y02

Recent Posts