Vivo Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोचा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करता येईल.
तुम्ही आता कंपनीचा Vivo Y17s स्मार्टफोन १२ हजार रुपयांपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनीने दोन रॅम आणि स्टोरेज पर्याय दिले आहेत. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि भागीदार रिटेल स्टोअरमधून तुम्हाला तो खरेदी करता येईल.
Vivo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये उत्तम डबल-मिरर डिझाइन देण्यात आले आहे आणि त्याची 2.5D फ्लॅट फ्रेम असून कंपनीने हा फोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन या दोन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. बजेट विभागातील मजबूत कामगिरी शिवाय, तो प्रीमियम अनुभव देईल आणि त्यातून कॅमेरा आउटपुट ग्राहकांना प्रभावित करेल, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच, यात AI पॉवर्ड सेफ चार्जिंगचा पर्याय दिला असून जेणेकरून ते रात्रभर चार्जिंगवर ठेवता येईल.
किती असे किंमत?
स्टोरेजचा विचार केला तर कंपनीच्या वापरकर्त्यांना दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये Vivo Y17s खरेदी करण्याचा पर्याय असणार आहे. त्यानुसार त्याची किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारे दुसरे वेरिएंट 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनची विक्री सुरू झाली असून तुम्ही तो फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व्यतिरिक्त, कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि भागीदार रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
Vivo च्या स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा HD वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोनमधील शक्तिशाली फोटोग्राफी अनुभवासाठी ग्राहकांना बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये, 50MP प्राथमिक कॅमेरा सेन्सरसह 2MP Bokeh कॅमेरा उपलब्ध असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल.
Vivo Y17s मध्ये उपलब्ध असणाऱ्या कॅमेरा फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, सेल्फी कॅमेरामध्ये Aura Screen Light फीचर उपलब्ध असल्याने त्यात कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करता येतील. तसेच सुपर नाईट मोड, स्टायलिश नाईट फिल्टर्स आणि बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट मोड देखील त्याचा भाग बनवला आहे. या फोनच्या 5000mAh क्षमतेच्या बॅटरीला 15W FlashCharge साठी सपोर्ट मिळतो.