Vivo Smartphone Offer : भन्नाट ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा Vivo T2 Pro, कसे ते जाणून घ्या…

Vivo Smartphone Offer : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. आता तुम्ही Vivo T2 Pro या फोनच्या खरेदीवर हजारोंची बचत करू शकता, विशेष म्हणजे हा 5G नुकताच लाँच झाला आहे.

आज त्याची पहिली सेल आहे. या सेलमधून तुम्ही स्वस्तात हा फोन खरेदी करू शकता. Flipkart आणि Vivo स्टोअर्सवरून तुम्ही तो खरेदी करू शकता. यात कंपनीने 64MP कॅमेरा आणि 16GB रॅम दिली आहे. जाणून घ्या किंमत आणि ऑफर.

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

खरंतर कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Vivo T2 Pro भारतीय बाजारात रॅम आणि स्टोरेजनुसार दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. किमतीचा विचार केला तर या फोनच्या 8GB 128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे.

तसेच लॉन्च ऑफर म्हणून, Vivo ICICI बँक आणि Axis बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 2000 रुपयांची झटपट सवलत मिळत आहे. Vivo T2 Pro आज संध्याकाळी 7:00 पासून Flipkart आणि Vivo स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी हा फोन न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड कलरमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.

जाणून घ्या खासियत

कंपनीचा हा फोन 6.78-इंचाच्या वक्र AMOLED डिस्प्लेसह येत असून जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट तसेच 1300 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हा फोन MediaTek Dimension 7200 प्रोसेसरने सुसज्ज असून तो Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर काम करतो. विशेष म्हणजे याच्या डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध असून यात 8GB 128GB आणि 8GB 256GB असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. यात 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळेल.

वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ऑरा फ्लॅश लाइटसह ड्युअल रियर कॅमेरे, OIS सपोर्टसह 64-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स आणि 2-मेगापिक्सेल बोकेह लेन्स दिल्या आहेत. तर सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये 66W फ्लॅश चार्ज सपोर्टसह 4600 mAh बॅटरी आणि चार्जिंगसाठी यात टाइप-सी पोर्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फोन 5G सपोर्टसह येतो आणि यात Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, GPS, IP52 रेटिंग सारखी शानदार फीचर्स दिली आहेत. तसेच या फोनमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक उपलब्ध नाही.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts