ताज्या बातम्या

Vivo चा जबरदस्त 5G फोन…फीचर्स ऐकून लगेच खरेदी कराल…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  दरदिवशी बाजरात नवनवीन स्मार्टफोन दाखल होत असतात. यातच आता मोबाईल प्रेमींसाठी विवो कंपनीने एक नवीन फोन सादर केला आहे. कंपनीनं Vivo Y55 5G फोन सध्या जागतिक बाजारात आणला आहे.

हा स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह तैवानमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी येईल हे मात्र अजूनही समजले नाही.

काय असणार आहे किंमत? जाणून घ्या :- तैवानमध्ये याची किंमत 7,990 NTD ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 21,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.

हे आहेत आकर्षक स्पेसिफिकेशन्स :- या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक FHD डिस्प्ले आहे, जो 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 81 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्योला सपोर्ट करतो.

यात मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. विवोचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित कस्टम स्किन Funtouch OS 12 वर चालतो.

जबरदस्त कॅमेरा… सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y55 5G स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे,

ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP सेन्सरसह 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहेत. ही बॅटरी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts