Vivo Smartphone : विवो ही आघाडीची दिग्ग्ज टेक कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी आता आपले नवीन 5G स्मार्टफोन लाँच करत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून कंपनी स्मार्टफोन कमी किमतीत लाँच करत असते. तसेच कंपनी सतत स्मार्टफोनवर ऑफर देत असते. कमी किंमत आणि उत्तम फीचर्स असल्यामुळे कंपनी इतर कंपन्यांना कडवी टक्कर देत असते. अशातच कंपनी आपला असून स्मार्टफोन लाँच करत आहे.
टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केलेल्या नवीन लीकनुसार, कंपनीचा आगामी Vivo X Flip चा डिस्प्ले Oppo Find N2 Flip सारखाच असणार आहे. टिपस्टरनुसार, Vivo X Flip 6.8-इंच उंच OLED डिस्प्लेसह लॉन्च केला केला जाण्याची शक्यता आहे. ज्याचा फुल-एचडी + रिझोल्यूशन 1080 x 2520 पिक्सेल असणार आहे. तर स्क्रीन 120Hz पर्यंत रिफ्रेश होईल.
फोटोग्राफीसाठी Vivo X Flip मध्ये कंपनी ड्युअल कॅमेरा सेटअपचा समावेश करू शकते.ज्यात 50-मेगापिक्सलचा Sony IMX866 प्राथमिक कॅमेरा आणि 12-megapixel Sony IMX663 अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेंसर दिसण्याची शक्यता दाट आहे. टिपस्टरने हे देखील उघड केले की Vivo आपला पहिला क्लॅमशेल-शैलीचा फोल्डेबल फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC सह लॉन्च करू शकते. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो.
कंपनीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4400mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. जो 44W जलद चार्जिंगला समर्थन देऊ शकते. Vivo X Flip मध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की कंपनीचा हा फोन सर्वप्रथम चीनच्या बाजारपेठेत लॉन्च केला जाणार आहे.
जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हा फोन येत्या काही आठवड्यात चीनमध्ये लॉन्च केला जाईल. भारतात आणि जागतिक बाजारात लॉन्च होणार की नाही याची माहिती अजूनही मिळाली नाही. कंपनी आता आपली Vivo X90 सीरिज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जी लवकरच भारतात लॉन्च होईल याची पुष्टी झाली आहे.