ताज्या बातम्या

Vivo Y56 5G : लॉन्च होणार विवोचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

Vivo Y56 5G : दिग्ग्ज टेक कंपनी विवोचा आणखी एक 5G स्मार्टफोन लॉन्च होण्यास सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याअगोदर या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत. कंपनी आपली आगामी Y सीरीज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

कंपनीच्या आगामी फोनचे नाव Vivo Y56 5G हे असणार आहे. कंपनीचा हा 5G बजेट फोन असून हा भारतात कधी येईल हे अजूनही समजू शकले नाही. कंपनी यात 5000mAh बॅटरी तसेच इतर फीचर्स देणार आहे. कंपनीचा फोन Funtouch OS 12 वर काम करेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टिपस्टर पारस गुगलानीने सोशल मीडियावर फिचर लीक केली आहेत. टिपस्टरने ट्विट केले की हा Vivo फोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायात उपलब्ध होणार आहे. कंपनी प्रोसेसर म्हणून त्यात MediaTek Dimensity 700 chipset देत आहे. हा चिपसेट थोडा जुना असून परंतु भारतात लॉन्च होणाऱ्या बजेट 5G स्मार्टफोन्समध्ये तो खूप वेळा दिसला आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत आहे.

यात, 13-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आहे. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी फोनच्या पुढच्या भागात 5-मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. या फोनमध्ये दिलेला डिस्प्ले 6.56 इंच असेल, जो वॉटरड्रॉप नॉच स्टाइल आणि HD+ रिझोल्यूशनसह येत आहे.

तो 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तर यात कंपनी 5000mAh बॅटरी देणार असून बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Funtouch OS 12 वर काम करेल. कंपनीचा हा फोन काही इतर रंगांच्या पर्यायांसह गोल्डमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Vivo Y56 5G

Recent Posts