Vodafone Idea RedX Plans Removed : Vodafone Idea (Vodafone Idea) ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी (Telecom Company) आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी (Vi customers) सतत नवनवीन प्लॅन सादर करत असते.
परंतु, Vodafone Idea ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण या कंपनीने (Vi) गुपचूप काही लोकप्रिय प्लॅन (Vi recharge plan)बंद केले आहेत.
Vodafone Idea ने यूजर्सना दिला मोठा धक्का!
Vodafone Idea ने गुप्तपणे, कोणतीही माहिती किंवा कारण न देता, त्यांचे लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन, Vodafone Idea RedX Plans बंद केले आहेत. हे प्लॅन बंद करण्यामागचे कारण काय होते, याबाबत सध्या काहीही माहिती मिळालेली नाही. हा बदल पहिल्यांदा TelecomTalk ने लक्षात घेतला.
Vi ने अचानक हे लोकप्रिय प्लॅन बंद केले
चला आता जाणून घेऊया कोणते प्लॅन बंद करण्यात आल्या आहेत. Vodafone Idea RedX प्लॅन्सच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्लॅनची किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
या यादीत एकूण तीन प्लॅन होते; फ्लॅगशिप REDX पोस्टपेड प्लॅनची किंमत रु. 1,099 होती आणि उर्वरित दोन फॅमिली पोस्टपेड प्लॅन रु. 1,699 आणि रु 2,299 मध्ये मिळू शकतात. लक्षात ठेवा की प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांचा लॉक-इन कालावधी देखील पाळावा लागेल.
तुम्ही यापैकी कोणतीही प्लॅन वापरत असाल तर काळजी करू नका. TelecomTalk नुसार, अनेक RedX वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे की त्यांचे प्लॅन अॅप आणि वेबसाइटवर दिसत नाहीत, परंतु सध्या कंपनीकडून कोणतेही अपडेट नाही.