Color Voter ID Card : मतदार ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. त्यामुळे तुम्ही भारतीय नागरिक आहे असे सिद्ध करू शकता. 18 वर्षांपुढील प्रत्येकाकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडेही मतदार ओळखपत्र असेल तर बातमी काळजीपूर्वक वाचा.
या मतदान ओळखपत्राचे निवडणूक आयोगाने डिजिटल व्हर्जन सादर केले आहे. यालाच e-EPIC असे म्हणतात. हे e-EPIC नक्की काय आहे? त्याचे काय फायदे आहेत? ते कसे आणि कुठे डाउनलोड करायचे? ते जाणून घेऊया.
डिजिटल मतदार कार्ड (e-EPIC) म्हणजे काय?
हे लक्षात घ्या की डिजिटल मतदार कार्ड हे सामान्य मतदार कार्डसारखेच वैध आहे. e-EPIC मतदार कार्ड फक्त पीडीएफ आवृत्तीमध्ये येत असून ते सुरक्षेच्या हेतूने उत्तम आहे. पीडीएफ आवृत्तीमध्ये असल्यामुळे त्यात छेडछाड होत नाही.
डिजिटल मतदार कार्डची पीडीएफ आवृत्ती ही ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी वापरली जाऊ शकते. त्वरित प्रवेशासाठी, हा डिजिटल आयडी पुरावा पीडीएफ म्हणून तुम्ही तुमच्या मोबाइल फोन किंवा डिजी लॉकरमध्ये जतन केला जाऊ शकतो.
डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स