Mudra Yojana : देशात सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यातच कंपन्या आपल्या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. तर कोणी आपल्या नोकरीला कंटाळले आहेत. त्यामुळे अनेकजण आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे.
परंतु पैशांअभावी त्यांना व्यवसाय सुरु करता येत नाही. केंद्र सरकार आता पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय एकूण 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे.काय आहे सरकारची ही योजना जाणून घेऊयात.
फायदे
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत तुमच्याकडून कर्जावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क घेतले जात नाही. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुद्रा कार्ड मिळते. डेबिट कार्डप्रमाणेच याचा वापर करता येतो.
10 लाख रुपयांपर्यंत मिळते कर्ज
जर तुम्हाला कोणताही छोटा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेता येते. योजनेंतर्गत कर्ज सुविधा फक्त बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी देण्यात येते.
अशी करा नोंदणी
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला https://www.mudra.org.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन प्रकारचे कर्ज देण्यात येते. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्जाचा समावेश असून योजनेच्या माध्यमातून देशात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे.