Money News : संपूर्ण जगावर गेल्या काही दशकातील सर्वात मोठ्या मंदीची टांगती तलवार असल्याची चाहून लागल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळानंतर सावरत असतानाच जगावर हे नवे संकट आले आहे. त्यामुळे आता मोठ्या कंपन्याही सावध झाल्या आहेत.
त्यांनी जशी सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे, तशीच सर्वसामान्य नागरिकांनीही आर्थिक निर्णय घेताना काळजी घेण्याची गरज आहे. मंदीची चाहूल लागल्याने शेअर बाजारात घसरण होत असल्याचे चित्र आहे.
विशेषत: टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या पाच ते सहा महिन्यात खूपच घसरले आहेत. अनेक तज्ज्ञांनी मंदी फक्त काही दिवसांवर असल्याचे म्हटले आहे. तर काहींच्या मते मंदी आली आहे फक्त त्याची औपचारिक घोषणा झालेली नाही.
यात टिकून राहण्यासाठी मोठ्या कंपन्या सावध पावले उचलू लागल्या आहेत. गुगल अमेझॉन, अॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्लासह जगातील सर्व दिग्गज कंपन्यांनी मंदीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. या कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. तर काहींनी नवी भरती थांबवली आहे.