ताज्या बातम्या

“मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा

पश्चिम बंगाल : देशात महागाईचा आलेख वाढताना दिसत आहे. अशातच मोदी सरकारवर (Modi Goverment) सडकून टीका करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनाही नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सततची पेट्रोल आणि डिझेल वाढ तसेच घरगुडती गॅस वाढीवरून शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगाल (West Bengal) मधील पोटनिवडणुकीच्या (By-election) रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर टीका केली आहे.

“अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आपण लोकशाही पाहिली आणि आता मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत” असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या मनाला येईल ते करायचं अशी हुकुमशाही प्रवृत्तीचं मोदी सरकार काम करत आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे”, असं सिन्हा म्हणाले. “नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढवले हा अहंकारच आहे.

तुम्ही याआधी कधी ऐकलं आहे का डिझेल आणि पेट्रोलचे दर नऊ दिवसांत आठ वेळा वाढले आहेत? असेही ते म्हणाले आहेत. १२ एप्रिल रोजी आसनसोलमधून तृणमूलच्या तिकिटावर शत्रुघ्न सिन्हा पोटनिवडणूक लढवत आहेत.

गेल्या दहा दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मोदी सरकारवर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.

Renuka Pawar

Recent Posts