ताज्या बातम्या

आमची तयारी झाली ! २०२४ ला ब्राह्मण मुख्यमंत्री असणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा कार्यकाल अडीच वर्षे राहिला असून ‘मी ब्राह्मण व्यक्तीला राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पाहू इच्छितो’, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले होते.

दानवे यांच्या विधानला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाण्यामध्ये (Thane) बोलताना पाठिंबा दिला असून २०२४ ची आमची तयारी सुरु असल्याचे सांगितले आहे.

ते म्हणाले, ‘आम्हाला सरकार पाडायचं नाही. मात्र, सरकार पडलं तर आम्हाला सरकार बनवायचं आहे. आमची २०२४ ची तयारी सुरु आहे. २०२४ मध्ये आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवा, अशाप्रकारचं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं होतं. दानवे यांच्या मताला माझा पूर्ण पाठिंबा आहे’.

यावेळी रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केले आहे. मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वेळा राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण (Brahmin) जरी असले तरी बहुजनांचे नेते आहेत, मागासवर्गीयांचे नेते आहेत, असेही आठवले यावेळी म्हणाले आहेत.

इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणारच आहेत. अडीच वर्षे झाली आहेत, उरलेली अडीच वर्षे घालवायची आहेत. मग पुन्हा देवेंद्र फडणवीस येणारत आहेत. पण मध्ये काही गडबड झाली की आम्ही आलोच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे हे ३ मे रोजी परशुराम जयंती निमित्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम देखील ब्राम्हण समाजाने केले’, असे दनवे म्हणाले होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts