अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून या महामारीत अनेकांना आपला जीव गमवला आहे. तरी देखील कोणाला शहाणपणा आला आहे असे सध्याच्या वातावरणावरून दिसत नाही.
या कठिण वातावरणात देखील अनेकजण मोठ्या धूमधडाक्यात लग्न समारंभ करत आहेत. त्याच सोबत इतर कार्यक्रमांना देखील गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा येऊन गेल्या असून तिसरी लाट उंबरठ्यावर आहे.
यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. एकीकडे देवाची प्रार्थना आणि मंदिरे बंद आहेत, तर दुसरीकडे दारूपासून सर्व काही सुरू आहे. याचेच वाईट वाटत असल्याचे इंदुरीकर महाराजांन म्हणाले.
गतवर्षापासून देशात कोरोना संसर्गाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्यातील लॉकडाऊनमुळे देशवासीयांना मोठ्या त्रासाला, समस्यांना आताच्या घडीलाही सामोरे जावे लागत आहे.
राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असले, तरी मंदिरे, धार्मिक स्थळे अद्याप बंदच आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या कारणावरून लग्न, इतर कार्यक्रम आणि दारूची दुकानेही सुरू असताना
राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याबद्दल समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांनी नाराजी व्यक्त केली.
कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल गावात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.