ताज्या बातम्या

Weather Alert : नागरिकांनो सावधान ! राज्यात कडाक्याच्या थंडीत होणार पाऊसाची एन्ट्री ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Alert : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यात पाऊसाची एन्ट्री होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात नोव्हेंबरमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंज्य महापात्रा यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले कि नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्रातील पाऊस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. परिणामी सामान्य दिवसाच्या तापमानापेक्षा थंड आणि रात्रीच्या तापमानापेक्षा जास्त उबदार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्य मान्सूनच्या हवामान प्रणालीमुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो’असंही ते म्हणाले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात यामहिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो त्यामुळे आकाश ढगाळ राहिल आणि दिवसाचे तापमान थंड राहणार आहे.

यामुळे आता महाराष्ट्रात दिवसाचे तापमान थंड होण्याचा अंदाज आहे तसेच रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यात नोव्हेंबरमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थंड असेल आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल.

हे पण वाचा :-  Indian Railways Update: रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्या धक्कादायक निर्णय ! रेल्वेची ‘ती’ परंपरा संपुष्टात ; वाचा सविस्तर माहिती

Ahmednagarlive24 Office

Recent Posts