ताज्या बातम्या

Weather Update : महाराष्ट्रात पुढील काही तासात कोसळणार धो धो पाऊस; या भागांना रेड अलर्ट जारी

Weather Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात अनेक ठिकाणी मान्सूनच्या (Monsoon) पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणांना झोडपून काढले आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर हवामान खात्याने महाराष्ट्रात काही भागांना रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे.

अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याने (IMD Weather Update) आज (14 जुलै) महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी येथे अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट कायम आहे.

IMD ने सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांसाठीही असाच इशारा दिला आहे. त्याचवेळी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत संततधार पावसामुळे विविध धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, 14 तारखेला पश्चिम मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी 13 ते 17 जुलै दरम्यान पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

यासोबतच 16 आणि 17 जुलै रोजी छत्तीसगड, 13 ते 16 जुलै रोजी ओडिशा, 15 रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची स्थिती आहे.

दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज म्हणजेच 14 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोणतीही शैक्षणिक संस्था उघडणार नाही.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्याच वेळी, मुंबईत काहीवेळा जोरदार वारे 45-55 किमी प्रतितास वेगाने 60 किमी ताशी पोहोचू शकतात. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, अमरावती, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

नाशिक आणि पुण्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो. याआधी बुधवारीही मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सध्या राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाच्या पुरामुळे आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts