Weather Update : देशात आता मान्सून (Monsoon) चे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक राज्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर देशातील बहुतांश राज्यांना उष्णतेचा सामना (Heat) करावा लागत आहे. अनेक भागात उष्णतेची लाट (Heat wave) कायम आहे. उन्हाने हैराण झालेल्या लोकांना आता पावसाची (Rain) प्रतीक्षा आहे.
दरम्यान, हवामान खात्याने एक मोठा अपडेट दिला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले की, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि
झारखंडच्या भागात उष्णतेच्या लाटेचा पुढील प्रकोप दोन ते तीन दिवस कायम राहील. त्याचवेळी, देशाची राजधानी दिल्लीत पुढील काही दिवस हवामान उष्ण राहण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्यानुसार राजधानी दिल्लीत १६ जूनपासून पावसाची शक्यता आहे. मात्र 15 जून रोजी दिल्लीकरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये १२ जूनपासून मान्सूनपूर्व क्रियाकलाप सुरू होण्याचा अंदाज आहे,
परंतु उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये १५ जूनपर्यंत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. येत्या चार दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
12 जून रोजी दिल्लीचे तापमान 44 अंशांवर होते. म्हणजेच दिल्लीतील जनतेला आजही उन्हाचा सामना करावा लागला. दुसरीकडे मान्सून मुंबईत दाखल झाला असून, त्यामुळे मुंबईकरांचे चेहरे फुलले आहेत.
आता मुंबईच्या तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. IMD नुसार, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि मुंबईच्या लगतच्या भागात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडू शकतो.