उसावर तणनाशक फवारले ! ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- शिर्डी शिवारातील इनामवाडी शिवारात कोणीतरी अज्ञात इसमाने चक्क शेतात उभा असलेला ऊस तणनाशक औषध फवारणी करून पूर्णपणे जाळून टाकल्याची घटना भरवस्तीच्या ठिकाणी घडल्याने शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिर्डीतील इनामवाडी या उपनगरात डॉ. सचिन सोपानराव गोंदकर यांच्या भावाचे श्रेत्र आहे, त्याची देखभाल सचिन गोंदकर करतात. त्यांनी शेतात उसाची लागवड केलेली आहे.

काल शेताकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. उसावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चक्क तणनाशक फवारणी करून ऊस पूर्णपणे जाळून टाकल्याचे निदर्शनास येताच त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी दोषीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे मागणी सचिन गोंदकर यांनी शिर्डी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे. या घटनेने गोंदकर यांचे दिड लाखांचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts