Weight Loss Tips : धावपळीच्या जगात अनेकजण पौष्टिक अन्नाकडे पाठ फिरवून चटपटीत (Spicy) खातात. दहापैकी पाच लोक वजनवाढीच्या (Weight gain) समस्येने त्रस्त असतात. बरेच उपाय करूनही अनेकांचे वजन कमी (Weight loss) होत नाही. त्यामुळे अनेकजण वाढत्या वजनापुढे हतबल झाले आहेत .
वाढत्या वजनामुळे मधुमेह (Diabetes) , उच्च रक्तदाब (high blood pressure), लठ्ठपणा (Obesity) यांसारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. परंतु वजन कसे नियंत्रणात आणावे,कोणता आहार घ्यावा असे अनके प्रश्न सतावत असतात.
खसखसमध्ये आढळणारे पोषक तत्व
खसखस (Poppy) हे औषधी गुणांनी परिपूर्ण मानले जाते. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. याव्यतिरिक्त, हे तांबे, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, प्रथिने, कार्ब, कॅल्शियम, फायबर आणि मॅंगनीजचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खसखस वापरा.