ताज्या बातम्या

Weight loss tips : नववर्षात करा वजन कमी करण्याचा संकल्प, फक्त या टिप्स फॉलो करा, रहाल फीट

Weight loss tips : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक नवीन वर्षाचे संकल्प करतात. बहुतेक लोक वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा विचार करतात. जर तुम्हीही यातीलच एक आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

कारण दरवर्षी संकल्प करूनही तुम्हाला तुमचे वजन कमी करता येत नसेल, तर या वर्षी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही या टिप्स अवश्य फॉलो करा.

जड नाश्ता

वजन कमी करायचे असेल तर सकाळी जड नाश्ता करा. जड नाश्ता केल्याने दुपारच्या जेवणात भूक कमी लागते, हलके जेवण घेतल्याने वजन कमी होते. नाश्त्यामध्ये फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा. सकाळच्या नाश्त्यात तेलकट पदार्थ कधीही खाऊ नका.

हायड्रेटेड

वजन कमी करण्यासाठी, शरीर हायड्रेटेड ठेवले पाहिजे. शरीर हायड्रेटेड राहिल्यास अन्नाची लालसा कमी होते. याशिवाय शरीरातील चयापचय गतीही वाढते.

आहार योजना बनवा

वजन कमी करण्यासाठी आहार योजनेकडे लक्ष द्या. वजन कमी करण्यासाठी, चरबीचे प्रमाण कमीत कमी ठेवा. अन्नातील साखरेचे प्रमाण कमी करा.

स्वयंपाकघरात निरोगी पदार्थ ठेवा

आपल्या स्वयंपाकघरात निरोगी पदार्थ ठेवा. अनेक वेळा किचनमध्ये अनारोग्यकारक गोष्टी असतात, त्यामुळे घरात हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा साठा ठेवा. भूक लागल्यावर हेल्गी स्नॅक्स खा.

व्यायाम करा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएटसोबतच वर्कआउट्स करणं खूप गरजेचं आहे. सकाळी व्यायाम केल्याने वजन लवकर कमी होते. अशा स्थितीत दररोज सकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळी व्यायाम केल्यानेही आजार होत नाहीत.

निरोगी दुपारचे जेवण

वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, रोटी, मसूर, कोशिंबीर यांचे सेवन करावे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts