अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-गुन्हा केला कि त्या व्यक्तीकडे आयुष्यभरासाठी समाज हा गुन्हेगार म्हणूनच पाहत असतो.
व असे गुन्हेगार आपल्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने याच रस्त्याने वाटचाल करण्यास सुरुवात करतात. मात्र आजच्या जगात असा एक व्यक्ती आहे कि ज्याने आपली गुन्हेगारीचे जग सोडून व्यवसायाची वाट स्वीकारली आहे.
गुन्हेगारीचा शिक्का पडलेल्या व्यक्तीला परतीचे मार्ग नसतात असे म्हटले जाते पण हा समज श्रीगोंदा तालुक्यातील विशाल भोसले या युवकाने खोटा असल्याचे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
कारण हा युवक आपल्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी झाले गेले सर्व विसरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहे.
यावेळी बोलताना विशाल म्हणाला की, नातेवाईकांच्या चुकीमुळे मला ६ महीने २० दिवस तुरुंगात घालवित असताना मी बाहेर जाऊन समाजात काय तोंड दाखवू या विचाराने भांबावून गेलो होतो.
तुरुंगातील मंडळी आता तु काही केलस किंवा नाही केलेस तरी पोलिसांचा ससेमीरा तुझ्या पाठीमागे लागणारच आहे.
त्यामुळे तु आता खरंच असे गुन्हे कर असे सल्ले देत होते तर दुसरीकडे मला सोडविण्यासाठी कुटुंबीयांची होणारी वाताहतीच्या बातम्या कानावर येत असल्याने दररोज नरक यातनांनी व्यथीत होत होतं.
तुरुंगातुन सुटका झाल्यानंतर काही दिवस मी व माझ्या कुटुंबीयांनी प्रचंड तणावात घालविले पण आज मला पुन्हा माणसात आल्यासारखे वाटत आहे.