Sovereign Gold : येत्या काही दिवसात होळीचा सण आहे. हा सण देशात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. होळीच्या मुहूर्तावर काही जण सोने खरेदीला पसंती देतात. लवकरच देशात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. अशातच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण तुम्ही आता होळीच्या दिवशी खूप स्वस्तात सोने खरेदी करू शकता. होय, तुम्ही आता RBIआर्थिक वर्ष 2022-23 साठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या चौथ्या मालिकेअंतर्गत सोन्याची विक्री करत आहे. याचा फायदा घुएन तुम्ही फक्त 5,511 रुपयांना सोने खरेदी करू शकता.
फक्त 5,511 रुपयांना खरेदी करा सोने
या सिरीजअंतर्गत कोणताही गुंतवणूकदार आता सार्वभौम सोने खरेदी करू शकतो. यासाठी इश्यूची किंमत 5,561 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. इतकेच नाही तर आता ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला 50 रुपयांची सूट दिली जाईल. म्हणजेच एक ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला फक्त 5,511 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही सोने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
जर त्याच्या खरेदीबद्दल बोलायचे झाल्यास, तर गुंतवणूकदार स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे खरेदी करू शकतात.हे लक्षात घ्या की ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत विक्री केली नाही.
जर यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकता. तसेच जर आपण ट्रस्ट किंवा कोणत्याही संस्थेबद्दल बोललो तर ते 20 किलोपर्यंतचे बाँड खरेदी करू शकतात.
हा एक प्रकारचा सरकारी बॉण्ड असून ही योजना आरबीआयकडून जारी करण्यात आली आहे. सरकारने त्याची सुरुवात 2015 मध्ये केली. तुम्ही ते सोन्याच्या वजनासाठी खरेदी करू शकता. जर हा बॉण्ड 5 ग्रॅमचा असल्यास तर हे समजून घ्या की त्याची किंमत 5 ग्रॅम सोन्याइतकी असणार आहे.
जाणून घ्या सार्वभौम गोल्ड बाँडशी निगडित गोष्टी