अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- आपल्या वेगवेगळ्या कलाकारांनी भरलेल्या व कॉमेडीमधील अग्रगण्य अशी मालिका तारक मेहता का उलटा चषमा या सीरिअल प्रचंड लोकप्रिय आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व जण हि सीरिअल आवडीने पाहतात.
या मालिकेतील जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोढी, भिडे अशा अनेक पात्र प्रसिद्ध आहेत. अशातच या मालिकेमधील एक जोडी एकमेकांना डेेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मालिकेतील बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टपू म्हणजेच अभिनेता राज अंदकत यांच्या अफेयर ची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
तर त्यासोबतच सोशल मीडियावर मीम्स चा पाऊस पडताना दिसत आहे. तर या बातमीनंतर अनेकांना मालिकेतील जेठालालची आठवण होत आहे. अनेक मजेशीर व्हिडिओ आणि जोक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काहींनी हा जेठालालचा अपमान असल्याचं म्हटलं तर कोणी आता जेठालालच काय होणार असं म्हणलं. नेटकऱ्यांनी टप्पू आणि बबिता डेट करत असल्यानं जेठालालवर निशाणा साधत ‘साला हे दुख काये खतम नही होता बे’, असं म्हटलं आहे.
तर टप्पू आणि बबिताच्या संबंधावर जेठालाल म्हणतो की, साप को पाल रखा है, अशा पद्धतीचे अनेक भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मीम्सची चर्चा खुपच होत आहे.
राज आणि मुनमुन या दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन दोघांपैकी एकानेही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या दोघांमध्ये नेमकं काय सुरुय, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.