ताज्या बातम्या

काय सांगता! आता या ठिकाणी गाय पालन करण्यासाठी देखील काढावा लागेल परवाना

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Animal Husbandry : भारतात मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) केले जाते देशात पशुपालन मुख्यता दूध उत्पादनासाठी (Milk Production) केले जाते.

यामुळे अनेक ग्रामीण आणि शहरी भागातील (Livestock Farmers) पशुपालक शेतकरी, जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाली की जनावरांना मोकाट मरणासाठी सोडुन देतात, यामुळे मुक्या प्राण्यांचे हाल होतात अनेक ठिकाणी यामुळे जनावरे उपासमारीने मरतात आणि इतर अनेक रोगांच्या विळख्यातही येतात.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता राजस्थान सरकारने (Rajsthan Government)प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आता अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या अनुसार आता पशुपालकांना गायी पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राजस्थान सरकारने लागू केलेल्या या कठोर नियमांनुसार, राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पशु मालकांना गायी पाळण्याचा परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा परवाना एक वर्षासाठी वैध असेल.

या नियमामुळे राज्यातील जवळपास 90 टक्के जनावरे कोणत्याही प्रकारच्या आजाराने आणि भूक-तहानाने मरण्यापासून वाचू शकतील, असा विश्वास राज्य सरकारला आहे. राजस्थान सरकारने लागू केलेल्या या नियमांना नवीन गोपालन नियम असे नाव देण्यात आले आहे.

नवीन गोपालन नियम आहे तरी काय

»राजस्थान सरकारने लागू केलेल्या नवीन पशुपालन नियमांमध्ये, पशुपालकांना खालील गोष्टीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

»शहरी आणि ग्रामीण भागातील पशुपालकांनाही गाय ठेवण्यासाठी 100 यार्ड जागा ठेवावी लागणार आहे. »शहरी भागात येणाऱ्या घरांमध्ये गाई-म्हशी ठेवण्यासाठी एक वर्षाचा परवाना घ्यावा लागणार आहे.

»रस्त्यावर मोकाट जनावरे फिरताना आढळल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

»गायी-वासरांपेक्षा जास्त गुरे असल्यास परवाना रद्द केला जाईल.

»जनावरांचे शेण दर दहाव्या दिवशी घराबाहेर कुठेतरी दूर फेकून द्यावे लागेल.

»जनावरांच्या कानाला प्राणी मालकाचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता टॅग करावा लागणार आहे.

»घराबाहेर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर जनावरे बांधण्यास मनाई आहे.

»याशिवाय परवान्यातील अटींचे कोणी उल्लंघन केल्यास त्याचा परवाना रद्द केला जाईल, त्यानंतर प्राणी मालकांना कधीही जनावर पाळता येणार नाही असे कठोर नियम राजस्थान सरकारने बनवले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts