Alert : सध्याच्या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी अनेकजण फेसबुकचाही वापर करत आहेत. अशातच मागील काही महिन्यांपासून अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.
अशातच मेटाच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीबद्दल एक दावा केला आहे त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. फेसबुक जाणूनबुजून वापरकर्त्यांच्या फोनची बॅटरी काढून टाकत असून फीचरच्या चाचणीच्या नावाखाली हे काम केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मेटाचे माजी कर्मचारी जॉर्ज हेवर्ड, असा दावा करतात की अशा फीचर्सच्या चाचणीत भाग घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना काढून टाकले आहे. फीचरची चाचणी करण्यास नकार दिल्यानंतर, जॉर्जच्या बॉसने त्यांना असे सांगितले की, “कंपनी काही लोकांना हानी पोहोचवून मोठ्या संख्येने लोकांना मदत करू शकते. जॉर्जने अमेरिकेतील मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात मेटाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्यात असे म्हटले आहे की फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या फोनची सर्वात जास्त गरज असताना त्यांचा प्रवेश गमावण्याचा धोका असतो.
वकिलांनी दिली ही माहिती
जॉर्जच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितले की, कंपनी कोणत्याही वापरकर्त्याच्या फोनच्या बॅटरीमध्ये कधीही गोंधळ घालू शकते. हे बेकायदेशीर असून अतिशय वाईट आहे. वकिलाच्या म्हणण्यानुसार, जॉर्जला एक प्रशिक्षण दस्तऐवज दिले होते ज्यात नकारात्मक चाचणी कशी करावी हे स्पष्ट केले आहे, जरी मेटाने अद्याप या संदर्भात कोणतेही विधान जारी केले नाही.