मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र पोलीस सूड भावनेने काम करत नाही. मी चुकलो तरी माझ्यावरही कारवाई करतील. सोमय्यांविरोधात लोकांच्या मनात चीड आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा लोकांना डिस्टर्ब करणारा आहे.
लोकांकडून पैसा गोळा केला गेला. देशाची आणि जनतेची दिशाभूल केली. अशा व्यक्तीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली असतील दोन दगडं मारली असतील तर भाजपला (Bjp) दु:ख वाटण्याचं कारण काय? भाजपनेही अशा गोष्टीचं समर्थन केलं आहे.
त्याचे तेच मत राहिलं आहे. जे देशद्रोही आहेत, गुन्हेगार आहेत त्यांना माफ केलं जाणार नाही, असं भाजपच सांगायची, असा टोला यावेळी बोलताना राऊत यांनी लगावला आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, घोटाळा करणाऱ्या आरोपीच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक केलं पाहिजे. त्यांचे डोनर्स कोण आहेत? कोणी त्यांना आतापर्यंत पैसे दिले आहे. दात्यांचं कॅरेक्टर काय आहे. त्यातील अनेक डोनर्स असे आहेत की त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
त्यांच्याकडून प्रतिष्ठानला पैसा आला आहे. ईडीच्या नावाने धमकावून पैसे घेतले आहेत. सोमय्या म्हणेल कागद कुठे आहे? तर कागद त्यांच्याकडेच आहे. सोमय्या कागद मागेल तर त्यांच्या तोंडात कागद देऊ, असेही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.