अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आमदार संग्राम जगताप यांनी ग्राउंड लेव्हलवर कार्य करून सर्वसामान्य नगरकरांना आधार देण्याचे काम केले.
प्रत्येक दिवस त्यांचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व बेड उपलब्ध करून देण्यात जात आहे.
अशा संकटकाळात कोरोनाशी झुंज देणारे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विरोधात प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अकलेचे तारे तोडणारे आरोप केले आहे.
कोरोनाच्या संकटमय वादळात बिळात बसून टीमटीमनाऱ्या किरणांना संकटाशी झुंज देणाऱ्या संग्रामय नेतृत्वाचे अफाट कार्य दिसणार नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी कॉंग्रेस चे किरण काळे यांच्यावर केली आहे.
संकट काळात बिळात जाऊन बसणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांना ग्राउंड लेव्हल चे कार्य काय समजणार? काँग्रेसचा मोठा नेता शहरात आल्याने जिभ टाळूला लावून वाट्टेल ते बरळत आहे. मात्र सुज्ञ नगरकरांना कोण किती कार्य करत आहे? ते ज्ञात आहे.
आमदारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पदाधिकाऱ्याने संकट काळात एखाद्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना मदत देऊन आपले कार्य सिद्ध करावे.
आमदार कार्य करीत असल्याने ते सर्वांसमोर प्रसिद्धीच्या माध्यमातून येत आहे.शहरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असताना परिस्थिती मोठ्या धैर्याने हाताळली जात आहे.
अशा परिस्थितीत माणसे जगविण्याचे कार्य करण्यापेक्षा इतरांचे कार्य पाहून पोट दुखणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याने संकट काळात राजकारण सोडून बिळाच्या बाहेर येऊन कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केले आहे.