३ मे रोजी मनसे काय करणार? नितीन सरदेसाई यांनी केलं जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ही अंतिम मुदत दिली आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे, सोबतच अक्षय तृतीया हा सणही आहे.

राज्य सरकारकडून लाऊडस्पीकरसाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनसेने ३ मे साठी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात महाआरती करणार आहेत. त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वापरून ही आरती केली जाईल, अशी घोषणा मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे ३ मे रोजी मनसे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर सरदेसाई यांच्या या घोषणेतून मिळाले आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts